अनिष्ठ प्रथेशिवाय गणेशोत्सव साजरा करा
By Admin | Updated: September 7, 2015 22:31 IST2015-09-07T22:31:11+5:302015-09-07T22:31:11+5:30
कुणाल खेमणार : चंदगडला गणराया अवॉर्डचे वितरण; माणगाव, जंगमहट्टी प्रथम

अनिष्ठ प्रथेशिवाय गणेशोत्सव साजरा करा
चंदगड : समाजातील अनिष्ठ प्रथेमुळे नितीमूल्ये बदलत आहेत. त्यामुळे व्यसनाधिनता वाढत आहे. हिंदू सणांचा उपयोग सामाजिक प्रगतीसाठी करण्यासाठी तरूण मंडळांनी पुढाकार घ्यावा. गणेशोत्सव कोणत्याही अनिष्ट प्रथेशिवाय साजरा करा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.पंचायत समिती सभागृहात चंदगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित गणराया अवॉर्ड वितरणप्रसंगी बोलत होते.पो. नि. अंगद जाधवर म्हणाले, माणूस जन्माला आल्यानंतर समाजासाठी काहीतरी करून मेला तर त्याच्या जीवनाचा अर्थ राहतो. त्यासाठी तरूण युवकांनी समाजासाठी गणेशोत्सव काळात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत माणगावच्या टिळक चौक गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक मंडळ-अडकूर, ओंमकार गणेश मंडळ - निट्टूर, चंद्रसेन गणेश मंडळ - चंदगड तर एक गाव एक गणपती स्पर्धेत जंगमहट्टीच्या अष्टविनायक मंडळाने प्रथम, जयहनुमान गणेश मंडळ - कुर्तनवाडी, भावेश्वरी नवयुवक गणेश मंडळ आमरोळी, श्रमिक सार्वजनिक गणेश मंडळ -पोवाचीवाडी तर उत्कृष्ट गणपती मूर्ती स्पर्धेत - रवळनाथ गणेश मंडळ अडकूर, शिवज्योत गणेश मंडळ शिनोळी यांनी बक्षिसे मिळविली.परीक्षक म्हणून प्रा. एन. एस. पाटील, नारायण गडकरी, विजय दळवी, एम. व्ही. कानूरकर, प्रा. जी. वाय. कांबळे, मारूती ठिकारे यांनी काम पाहिले.माजी राज्यमंत्री भरमू पाटील, नरसिंगराव पाटील, तहसीलदार आप्पासाहेब समींदर, डॉ. विश्वनाथ पाटील, फादर फॅजीस्टन डिसोझा, मौलाना अब्दुल नाईक यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी गोकुळचे संचालक दीपक पाटील, बाबूराव हळदणकर, सचिन बल्लाळ, अनुराधा पाटील, तुळसा तरवाळ, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, राजेंद्र परीट, एस. डी. डवरी, सी. जी. गुजर, एस. बी. तळवडेकर आदींसह सरपंच,
तंटामुक्त अध्यक्ष, तालुक्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. हणमंत पाऊसकर यांनी सूत्रसंचलन केले. नंदकुमार ढेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांनी केला खर्च
सामाजिक बांधिलकी जोपासत गणराया
अवॉर्ड वितरण
कार्यक्रमाचा खर्च तालुक्यातील
ख्रिश्चन व मुस्लीम बांधवांनी केला. या वितरणाला ख्रिश्चन व मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.