गणेशोत्सव साधेपणाने साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:27+5:302021-08-29T04:25:27+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील साखरे मंगल कार्यालयात पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. नेसरीचे सरपंच ...

Celebrate Ganeshotsav simply | गणेशोत्सव साधेपणाने साजरे करा

गणेशोत्सव साधेपणाने साजरे करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील साखरे मंगल कार्यालयात पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. नेसरीचे सरपंच आशिष साखरे व बटकणंगलेचे सरपंच सूरज जाधव यांची उपस्थिती होती.

श्रींच्या उंचीची मर्यादा चार फुटांपर्यंत असावी, गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक होणार नाही, साऊंड सिस्टीम लावल्या जाणार नाहीत, दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करावी, एकत्रित लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्यविषयक शिबिरे व रक्तदान शिबिरे, प्रबोधनात्मक कार्यक्रमावर भर देण्याविषयी आवाहन करण्यात आले.

यावेळी नेसरीसह अर्जुनवाडी, सरोळी, तारेवाडी, सांबरे, हडलगे, हेब्बाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, लिंगनूर तर्फे नेसरी या गावातील पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. हवालदार शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पोलीस प्रशासन व गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २८०८२०२१-गड-०५

Web Title: Celebrate Ganeshotsav simply