शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या; गाईनं मारलं तर..

By भीमगोंड देसाई | Updated: February 10, 2023 12:18 IST

सोशल मीडियातून खिल्ली

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : फेब्रुवारी महिन्याच्या १४ रोजी देशभर प्रेमिक एकमेकांना मिठी मारून, गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करतात. त्याच दिवशी यंदा गाय आलिंगन दिन साजरा करण्याचा अजब फतवा केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंडळाचे सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी सोमवारी काढला. हा फतवा अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवरील पशुसंवर्धन विभागाकडे बुधवारी आला. पण याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे शासकीय यंत्रणेला अडचणीचे आहे. केंद्र सरकारकडून आदेश आल्याने वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्यास पत्र पाठवून आपली जबाबदारी झटकत आहेत.पशुसंवर्धनच्या त्या फतव्यात म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या पौष्टिक स्वभावामुळे तिला कामधेनू आणि गोमाता म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचा आलिंगन दिवस म्हणून साजरा करावा.सोशल मीडियातून खिल्लीगाय आलिंगन दिन साजरा करण्यासंबंधी पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. गाईला बैल, वासरूही आलिंगन देत नाही तर इतर लोक कशी मिठी मारणार, असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक जण विचारून या आदेशाची खिल्ली उडवत आहेत. पालन, पोषण करणाराही गाईला मिठ्ठी मारत नाही तर प्रेम व्यक्त करण्यासाठी अंगावरून हात फिरवतो, चांगला आहार देतो. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी आलिंगन द्या, असा आदेश देणे म्हणजे शुध्द भंपकपणा असल्याच्याही सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत.

गाईला मिठी मारून उद्घाटन होणार का ?परक्या व्यक्तीने गाईचे आलिंगन घेताना ती उधळून जखमी केली, किंवा त्या गाईच्या अंगावरील गोचिड, पिसवा चिकटल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा खोचक प्रश्नही विचारला जात आहे. गाय आलिंगन दिनाचे उद्घाटन आमदार, खासदार, अधिकारी गाईला आलिंगन देत फोटोसेशन करून करणार की, केवळ वातानुकूलित कार्यालयात बसून आदेश देणार याबद्दल जनमानसात उत्सुकता आहे.

गाय आलिंगन दिन साजरा करण्यासंबंधीचे पत्र मिळाले आहे. याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे. - वाय. ए. पठाण उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेcowगाय