अंबप येथे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:18 IST2021-06-06T04:18:52+5:302021-06-06T04:18:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण करून ...

Celebrate Environment Day by planting trees at Ambap | अंबप येथे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा

अंबप येथे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.

गणेश संस्था समूहाचे संस्थापक रामकृष्ण लोकरे यानी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास रोपे भेट दिली. रामकृष्ण लोकरे, सुरेश पाटील अंबप वाहनधारक पतसंस्थेचे उपाध्यक्ष पी. एस. लोकरे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, जीवन शिक्षण विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे, कन्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मारुती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

यावेळी माजी सैनिक जयवंत डोंगरे, ज्येष्ठ शिक्षक दिलीप चरणे, दिलीप पाटील, विजया पाटील, सुनील कांबळे, राजू दाभाडे उपस्थित होते.

फोटो ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना रामकृष्ण लोकरे व जयवंत डोंगरे. सोबत मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील व इतर.

Web Title: Celebrate Environment Day by planting trees at Ambap