मलकापुरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

By Admin | Updated: February 23, 2015 00:21 IST2015-02-22T22:41:25+5:302015-02-23T00:21:18+5:30

मलकापूर पालिका सभा : अग्निशमन केंद्रासाठी ५१ लाख रुपये प्राप्त

CCTV cameras will be installed in Chowk in Malkapur | मलकापुरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

मलकापुरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

मलकापूर : मलकापूर शहरातील सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील होते.मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांनी स्वागत केले. मलकापूर शहरातील बारा चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे व सोलर दिवे बसविण्याचा ठराव करण्यात आला. शहरातील दलित वस्तीमध्ये विविध कामे करण्यासाठी शासनाकडून ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासनाने २००८ पासून मुख्याधिकारी वेतनभत्ता दिलेला नाही, तरी शासनाकडे ३५ लाखांचा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव करण्यात आला. शासनाकडून कामगारांचा पगार भागविण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला जात नाही, तरी पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांनी सांगितले. समाज मंदिराची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची मागणी नगरसेवक सुधाकर पाटील, राजश्री ढोणे यांनी केली.अग्निशमन सेवा केंद्रासाठी शासनाकडून ५१ लाख २० हजारांचा निधी प्राप्त झाला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील मटण मार्केटची दुरुस्ती करण्याची मागणी सुधाकर पाटील यांनी केली. शहरातील तरुणांसाठी नगराध्यक्ष चषक घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.महिला जागतिक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा ठराव करण्यात आला. सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उद्घाटन समारंभ घेण्याचे सर्वानुमते ठरले. अग्निशमन भरतीला सभागृहाने मान्यता दिली. पालिकेकडे नोकरी करून निवृत्त झालेल्या कामगारांना शासनाकडून दहा टक्के वाढीव फरकाची रक्कम देण्याचा ठराव करण्यात आला. स्मशानभूमी रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी नगरसेवक शौकत कळेकर यांनी केली.चर्चेत नगरसेवक सुधाकर पाटील, अमोल केसरकर, भगवान सपाटे, संजय मोरे, शोभा मिरजकर, जयश्री ढोणे, आशा घेवदे, सविता कोठावळे, नीलम लगारे यांनी भाग घेतला. सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. भगवान सपाटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: CCTV cameras will be installed in Chowk in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.