शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

CBSE 10th Result 2018 : दहावीत कोल्हापूरच्या शाळांचे घवघवीत यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:06 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. 

ठळक मुद्देनिकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये ‘सोहम घेवारी’ अव्वल

कोल्हापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या शाळांमधील दहावीची परीक्षा मार्चमध्ये झाली. त्याचा निकाल मंगळवारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर जाहीर झाला. संकेतस्थळावर परीक्षेचा बैठक क्रमांक, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, शाळेचा सांकेतिक क्रमांक नोंदविल्यानंतर निकाल दिसत होता.

कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये ‘सोहम घेवारी’ अव्वलकोल्हापूर पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. सोहम घेवारी याने ९८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकविला. समीक्षा कुलकर्णीने(९६.२ टक्के) द्वितीय, अनुष्का गोलवलकर व ईशा गाटे यांनी (९६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. यातील सोहमने समाजशास्त्र व संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर, इंग्रजीमध्ये ९७, विज्ञानमध्ये ९८ गुण मिळविले.

समीक्षा हिने विज्ञानमध्ये ९८, इंग्रजीत ९७ गुण, तर ईशाने संस्कृतमध्ये १००, इंग्रजीत ९७ गुण मिळविले. अन्वित दामले याने संस्कृतमध्ये शंभर, कैलास रोहिदास याने गणितमध्ये ९६ गुण, तेजल कुंभारने हिंदीमध्ये ९५ गुण मिळविले.

या शाळेतील वीस विद्यार्थी ९० टक्कयांहून अधिक गुणांनी, ४० विद्यार्थी हे विशेष उच्च श्रेणीमध्ये, तर अन्य विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्य उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, अंजली मेळवंकी आदींसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

शांतीनिकेतन डॉ.डी.वाय.पाटील, अकॅडमीचे शांतीनिकेतन स्कूलचा सीबीएसईचा दहावी निकाल यंदाही १०० टक्के लागला. १८१ विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थी उच्च श्रेणीमध्ये (९५ -१०० टक्के), १६ विद्यार्थी मेरीटमध्ये (९१ -९५ टक्के) तर १०२ विद्यार्थी विशेष श्रेणीत (९० -७० टक्के) तसेच प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये अक्षयनी पवार (९७.४ टक्के), मयंक सिन्हा (९७.४ टक्के), रिध्दि निल्ले (९७.२ टक्के), ग्रीष्मा मेहता (९६.६ टक्के), प्रद्युम्न दानिगोंड (९५.४ टक्के). या सर्वांना संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्य मनिषा पाटील सर्व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

विबग्योर ग्रुप आॅफ स्कूलविबग्योर ग्रुप आॅफ स्कूलचा सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये शाळेतील देवांशी अंकुर देढिया हिने ९५.६ टक्केसह शाळेत अव्वल ठरली. तसेच किरण तानाजी पाटील हिने ९४.६ टक्के, अभिषेक गोपाळ दरकने ९४.६ टक्के गुण मिळविले. त्यांना प्राचार्य टी. बालन यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :CBSE 10th Result 2018सीबीएसई दहावी परीक्षा निकाल २०१८kolhapurकोल्हापूर