सीबीएसई आणि आयसीएसईला टक्कर देण्यासाठी आता महाराष्ट्राचे 'इंटरनॅशनल बोर्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 11:04 AM2018-05-04T11:04:29+5:302018-05-04T11:04:32+5:30

एमआयईबीचा अभ्यासक्रम हा साधारण सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांसारखाच असेल.

Maharashtra International Education Board MIEB will be started by Maharashtra govt this year says Vinod Tawde | सीबीएसई आणि आयसीएसईला टक्कर देण्यासाठी आता महाराष्ट्राचे 'इंटरनॅशनल बोर्ड'

सीबीएसई आणि आयसीएसईला टक्कर देण्यासाठी आता महाराष्ट्राचे 'इंटरनॅशनल बोर्ड'

Next

मुंबई: देशातील आयसीएसई व सीबीएसई या शिक्षण मंडळांच्या धर्तीवर आता राज्य सरकारकडूनही स्वतंत्र शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ ( एमआयईबी) असे या बोर्डाचे नाव असेल. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. एमआयईबीचा अभ्यासक्रम हा साधारण सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांसारखाच असेल. जेणेकरून एमआयईबीला जागतिक पातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करता येईल, असे तावडे यांनी सांगितले. 



 

Web Title: Maharashtra International Education Board MIEB will be started by Maharashtra govt this year says Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.