गडहिंग्लजमध्ये तलाठी लाच घेताना जाळ्यात

By Admin | Updated: December 19, 2014 23:23 IST2014-12-19T23:05:25+5:302014-12-19T23:23:46+5:30

सात-बारासाठी चार हजारांची लाच

In the castle, the talathi bitch was caught in the trap | गडहिंग्लजमध्ये तलाठी लाच घेताना जाळ्यात

गडहिंग्लजमध्ये तलाठी लाच घेताना जाळ्यात

गडहिंग्लज : खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारावर नाव नोंदविण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज सज्जाचा तलाठी बाळकृष्ण भीमराव मगदूम (वय ५२, रा. गुजर वसाहत, कडगाव रोड गडहिंग्लज, मूळ गाव-पिंपळगाव, ता. भुदरगड) याला रंगेहात पकडले. येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अविनाश ताशिलदार (रा. शेंद्री रोड, गडहिंग्लज) यांनी रणजित पोवार यांची गडहिंग्लज हद्दीतील पाच गुंठे जमीन खरेदी केली. त्यांनीे स्वत:चे नावे सात-बारा उतारा मिळण्यासाठी १ डिसेंबर रोजी रितसर अर्ज केला. नंतर १६ डिसेंबर रोजी ताशिलदार यांनी तलाठी मगदूम यांची भेट घेतली असता मगदूम याने याकामी सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ताशिलदार यांनी तक्रार दाखल केली होती. तडजोडीनंतर चार हजार रुपयांची लाच ताशिलदार यांच्याकडून स्वीकारताना मगदूम याला त्यांच्या कार्यालयात पथकाने रंगेहात पकडले.

‘आॅलराऊंडर’
तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाकडील कोणताही कार्यक्रम, उपक्रम असो ‘मगदूम रावसाहेबा’शिवाय कुणाचेच पान हालायचे नाही. बहुतांशी ‘आॅफिशियल’ आणि ‘अनआॅफिशियल’ बिले मगदूम रावसाहेबच पास करायचे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यातून त्यांची ‘आॅल राऊंडर’ अशी एक वेगळी प्रतिमा बनली होती. त्याचाच ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ नडल्याची चर्चा सर्वत्र होती.
मोठे व्यवहार
जिल्ह्याचा उपविभाग म्हणून वेगाने विस्तारणाऱ्या गडहिंग्लजमधील जागांचे भावही गगनाला भिडले आहेत. दिवसाकाठी होणारे अनेक मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार ‘तलाठी सज्जा’ शिवाय केवळ अशक्य. सुमारे चार वर्षांपासून हा सज्जा मगदूम सांभाळत होते. त्यांची ‘मागणी’ दिवसेंदिवस वाढत गेल्यानेच ही वेळ आल्याची चर्चा सुरू होती.

Web Title: In the castle, the talathi bitch was caught in the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.