शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अकॅडमीतील तोडफोडप्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:42 IST

विद्यार्थ्याच्या आत्महत्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने केली होती तोडफोड

इचलकरंजी : येथील यश यादव या विद्यार्थ्याच्या आत्महत्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने श्रद्धा अकॅडमीच्या मुख्य इमारतीवर केलेल्या दगडफेकप्रकरणी एका माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे. राहुल राजीव आवळे, इंद्रजीत घोरपडे, संतोष आवळे, जमिल मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पवते, पवन तडाखे, सतीश आवळे, अजित भोरे, वसीम कलावंत, महेश केंगार, किशोर आवळे, दस्तगीर बागवान, अमर आळंदे, सचिन कुंभार, (सर्व रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यांच्यावर भादंवि कलम ३२४ (४), १८९ (२), १८९ (४), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(क), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यश याने हॉस्टेलमधे मंगळवारी (दि.१७) सकाळी बाथरूममध्ये टायने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा निषेध नोंदवत सायंकाळी संतप्त युवकांनी जमावबंदी आदेश असताना रिक्रेशन हॉल परिसरातील श्रद्धा अकॅडमीच्या इमारतीवर जोरदार दगडफेक करत इमारतीच्या काचा फोडण्यासह फुलझाडांचे नुकसान, तसेच अकॅडमीचे डिजिटल बोर्ड फाडून अंदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.