शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

भरतीत अन्याय झाल्यास न्यायालयात

By admin | Updated: February 15, 2017 01:02 IST

सकल मराठा समाजाचा इशारा : महानगरपालिकेतील ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदाची भरती

कोल्हापूर : महानगरपालिकेतील ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदाच्या भरतीत मराठा समाजावर अन्याय झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे आयुक्त पी. शिवशंकर यांना दिला. निवड प्रक्रिया पारदर्शक करावी, भरतीसंदर्भातील निकषांची काटेकोर पूर्तता करावी आणि राज्य सरकारचे मार्गदर्शन मिळेपर्यंत कोणालाही नियुक्ती आदेश दिले जाऊ नयेत, असा आग्रह समाजातील कार्यकर्त्यांनी यावेळी धरला. महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदांवरील अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून प्रक्रिया पात्र उमेदवारांना नेमणूक देण्यापर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी सकल मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी भरतीत घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आणली आहे. दि. ४ फेब्रुवारीला समाजातील कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची भेट घेऊन झालेला तांत्रिक घोटाळा निदर्शनास आणून दिला. त्यावेळी त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर आल्यानंतर त्यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. प्रा. जयंत पाटील, अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी भरती प्रक्रियेला विरोध नाही, मागासवर्गीय उमेदवारास खुल्या गटातून भरती करून घेण्यास विरोध नाही, आरक्षणालाही विरोध नाही, असा खुलासा करतानाच ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व्हावी, निकषांचे पालन करून करावी, असा आग्रह धरला. या प्रक्रियेत युपीएससी व एमपीएससीने केलेल्या भरतीसंदर्भातील निकषांचे पालन केलेले नाही. संपूर्ण देशभर एकच नियम असताना कोल्हापुरातच फक्त निकष बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अत्यंत मुद्देसूद, नियमांतील विसंगती आणि सुरू असलेली चुकीची प्रक्रिया याबाबतचे वास्तव युक्तिवाद बाबा इंदूलकर व जयंत पाटील यांनी केला. आम्ही मांडलेले मुद्दे पटत असतील तर प्रक्रिया थांबवा, चुकीचे काही करू नका, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त शिवशंकर यांनी महापालिकेची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, सकल मराठा समाजाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवून घेण्यात आले. सरकारने दिलेल्या निर्देशांप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवित आहोत तसे लेखी पत्र तुम्हाला दिले जाईल. जर शंका असतील तर निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच ज्यांना नियुक्तिपत्रे दिली जातील ती अटींना अधीन राहून दिली जातील. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, बाबा पार्टे, दिलीप पाटील, बाजीराव चव्हाण, अजित राऊत, जयेश कदम, गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.सकल मराठा समाजाच्या मागण्याखुल्या प्रवर्गातून मागासवर्गीय उमेदवार परीक्षा देणार असेल तर त्याला खुल्या प्रवर्गाचे निकष लावावेत. त्याच्या वयाची अटही ३८ वर्षे हीच ठेवली गेली पाहिजे.परीक्षा शुल्कसुद्धा खुल्या प्रवर्गाचेच भरले पाहिजे. समान गुण मिळाले असतील तर जास्त वय असलेल्याला नेमणूक द्यावी. निवड प्रक्रिया पारदर्शक करावी