शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्नास जात आडवी आली; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: May 2, 2024 13:20 IST

कोथळी येथील प्रकार, तरुणीच्या आईची करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : वेगळ्या जातीतील असल्यामुळे प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी घरी बोलवून दमदाटी केल्यामुळे कोथळी (ता. करवीर) येथील सानिका संभाजी कुंभार (वय २०) हिने २९ एप्रिल रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा प्रियकर रोहित उर्फ अक्षय रंगराव मुसळे, त्याचे वडील रंगराव गोविंदा मुसळे आणि आई सुलाबाई रंगराव मुसळे (तिघे रा. कोथळी) यांच्या करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबत मृत तरुणीची आई लता संभाजी कुंभार (वय ४८, रा. कोथळी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका आणि रोहित यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या लग्नाला रोहितच्या घरातून विरोध होता. त्याच्या आई-वडिलांनी सानिका हिला घरी बोलवून प्रेमसंबंध आणि लग्नास विरोध केला. 'तू आमच्या जातीत बसत नाहीस. सून म्हणून तू आम्हाला पसंत नाहीस. रोहितशी लग्न केलेस तर तुला घरात घेणार नाही. त्यापेक्षा तू दुसरीकडे लग्न कर.' असे सांगून तिला धमकावले. या नैराश्यातून तिने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रोहितसह त्याच्या आई, वडिलांच्या विरोधात लता कुंभार यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस