राष्ट्रकुलमध्ये घुमला ॐकार -

By Admin | Updated: July 27, 2014 23:15 IST2014-07-27T23:14:27+5:302014-07-27T23:15:26+5:30

चिपळूणच्या ‘ओंकार’ला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य

Cars in the Commonwealth Games - | राष्ट्रकुलमध्ये घुमला ॐकार -

राष्ट्रकुलमध्ये घुमला ॐकार -

-ग्लासगो : ग्लासगो येथे सुरू असलेल्या २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या ओंकार ओतारीने ६९ किलो गटात कांस्यपदक पटकावले. -कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील २६ वर्षीय ओंकारने स्नॅचमध्ये १३६ किलो, क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो, असे एकूण २१६ किलो वजन उचलून भारताला पदक मिळवून दिले.
-ओंकार हा मूळचा चिपळूणचा आहे. मात्र, लहानपणापासूनच तो कुरुंदवाड येथे आजोळी राहतो. त्याचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर कुरुंदवाड येथे, तर माध्यमिक शिक्षण कुरुंदवाडच्याच साने गुरुजी विद्यालयात झाले. हर्क्युलस व्यायामशाळेत वेटलिफ्टिंगचे धडे त्याने गिरवले आहेत.

Web Title: Cars in the Commonwealth Games -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.