जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:55+5:302021-07-05T04:15:55+5:30
विविध उपक्रम राबविणार जुन्या पिढीतील उद्योजकांनी अनेक आव्हानांचा सामना करत कोल्हापूरचा उद्योग आणि इंजिनिअरिंग असोसिएशनची उभारणी झाली आहे. त्यांनी ...

जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा
विविध उपक्रम राबविणार
जुन्या पिढीतील उद्योजकांनी अनेक आव्हानांचा सामना करत कोल्हापूरचा उद्योग आणि इंजिनिअरिंग असोसिएशनची उभारणी झाली आहे. त्यांनी एक चळवळ म्हणून त्यात योगदान दिले. असोसिएशन अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत असल्याचा आनंद वाटत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी सांगितले.
चौकट
कर्तबगार उद्योजकांचा वारसा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ४२ एकर जागा देवून शिवाजी उद्यमनगरीचा पाया रचला. या नगरीला कर्तबगार उद्योजकांचा वारसा लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९४७ मध्ये दि कोल्हापूर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्करशाॅप ओनर्स युनियन स्थापन झाली. या संस्थेचे सन १९६३ मध्ये नाव बदलून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन करण्यात आले. या संस्थेनंतर कोल्हापूर चेंबर, उद्यम सोसायटी, केआयटी कॉलेज आदींची स्थापना झाली. केईएच्या अमृतमहोत्सवी लोगो अनंत खासबारदार यांनी तयार केला आहे. हा लोगो असोसिएशनच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सचिव दिनेश बुधले यांनी सांगितले.
कोण, काय, म्हणाले?
श्रीकांत देसाई : ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा आदींनी उद्योगांतील उत्पादन, विक्री, बिल अदा करण्याच्या पद्धतीत नवतंत्रज्ञानाचा वापर केला. ते आदर्शवत आहे.
प्रकाश चरणे : या अमृतमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमात माजी अध्यक्षांना सहभागी करून घेतल्याचा आनंद आहे. या वर्षातील उपक्रमांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल.
श्रीकांत दुधाणे : उद्योगांत नवनवीन गोष्टींचा समावेशाबाबत असोसिएशनने मार्गदर्शनाची परंपरा जोपासली असून ती यापुढेही कायम राहावी.
फोटो (०४०७२०२१-कोल-इंजिनिअरिंग असोसिएशन) : कोल्हापुरात रविवारी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अमृतमहोत्सव बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा यांच्या हस्ते, तर आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी डावीकडून बाबासोा कोंडेकर, अभिषेक सावेकर, संजय अंगडी, नितीन वाडीकर, श्रीकांत दुधाणे, सोहन शिरगावकर, कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, सचिन मेनन, श्रीकांत देसाई, हर्षद देसाई, प्रसन्न तेरदाळकर, प्रकाश चरणे, अमर करांडे, रणजित शाह, अतुल आरवाडे, जयदीप मांगोरे उपस्थित होते.
फोटो (०४०७२०२१-कोल-इंजिनिअरिंग असोसिएशन लोगो)