शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांशी बोलल्याबद्दल वाहक निलंबित : एस. टी. प्रशासनाची दडपशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:50 IST

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी केलेल्या राज्यस्तरीय संपाबाबत वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत भाग घेतल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागातील वाहक व इंटक चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एस.टी.महामंडळाने शनिवारी निलंबित केले. त्यामुळे प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप कर्मचाºयांतून होत आहे.राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी ...

ठळक मुद्देचिथावणीचा ठपका; कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी केलेल्या राज्यस्तरीय संपाबाबत वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत भाग घेतल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागातील वाहक व इंटक चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एस.टी.महामंडळाने शनिवारी निलंबित केले. त्यामुळे प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप कर्मचाºयांतून होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. मात्र, ही वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाºयांना अमान्य असल्याने ८ व ९ जून रोजी कर्मचारी स्वत:हून ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था बंद होती.

त्याचदरम्यान ८ जूनला वृत्तवाहिनीवर संपाबाबत कोल्हापूर विभागातील वाहक व महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांनी सहभाग घेतला. या चर्चेत ‘त्यांनी राज्य परिवहन प्रशासनाच्या ध्येय-धोरणाविरोधी मत मांडले होते. त्यामुळे बंदमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाºयांना चिथावणी मिळाली आहे. त्यातून गैरशिस्तपणा दिसून येतो’, असा ठपका ठेवत महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने साळोखे यांना निलंबित केले. ही कारवाई व विनंती बदलीची यादी प्रशासन मागवत असून ते एकप्रकारे संपकरी कर्मचाºयांवर दडपशाही करीत असल्याची भावना होत आहे.

‘आप्पा’ सामान्य कार्यकर्तेमहामंडळातील कोल्हापूर विभागात १९८९ साली वाहक या पदावर साळोखे रुजू झाले. गगनबावडा आगार सचिवपदी त्यांनी काम केले आहे.सर्वांना व अन्य संघटनांना सोबत घेऊन प्रशासनामधील सामान्य कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. इंटकच्या विभागीय सचिवपदी ते २००९ पासून काम करीत आहेत. प्रामाणिक व सामान्य कार्यकर्ते म्हणूनच ‘आप्पा’ ओळखले जातात.संपर्क झाला नाही...कोल्हापूर विभागीय कार्यालयास शनिवारी रमजान ईदची सुटी असूनसुद्धा प्रशासनाच्यावतीने त्यांना निलंबित केल्याचे पत्र देण्यात आले. याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे व वाहक साळोखे यांच्याशी संपर्क साधला; परंतु तो होऊ शकला नाही.विनंती बदलीच्या कर्मचाऱ्यांची यादीमहामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ८ व ९ जूनच्या अघोषित संपाच्या कालावधीत बरेच कर्मचारी कामावर गैरहजर होते.विभागामधील यादीनुसार विनंती बदली मागणाºया कर्मचाºयांपैकी पदनिहाय कोणकोणते कर्मचारी संपामध्ये सहभागी होते, त्यांची माहिती उद्या, सोमवारपर्यंत पाठविण्याचे पत्र कोल्हापूर विभागास वरिष्ठ प्रशासनाच्यावतीने प्राप्त झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ