शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

CoronaVirus Lockdown : सावधान! निमित्त औषध फवारणीचे, प्रयत्न चोरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:39 IST

: घराच्या परिसरात कीटकनाशक पावडर टाकायची आहे, औषध फवारणी करायची आहे, असे निमित्त काढून दोन चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दिवसाढवळ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. त्यानंतर नागरिकांनी त्या चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसावधान! निमित्त औषध फवारणीचे, प्रयत्न चोरीचारुईकर कॉलनीतील घटना : दोघा भामट्यांकडून प्रकार; परिसरात खळबळ

कोल्हापूर : घराच्या परिसरात कीटकनाशक पावडर टाकायची आहे, औषध फवारणी करायची आहे, असे निमित्त काढून दोन चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दिवसाढवळ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. त्यानंतर नागरिकांनी त्या चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.कदमवाडी, रूईकर कॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळी नगरसेवक सत्यजित कदम यांनी ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी केली. पण त्यानंतर दुपारी दोन युवक तोंडाला मास्क लावून रूईकर कॉलनी परिसरातील डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांच्या घराच्या आवारात कीटकनाशक पावडर फवारणी करायचे असल्याचे सांगून त्यांनी सुमारे तासभर पावडर टाकून निघून गेले.

सुमारे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे दोघे पुन्हा आले. त्यांनी बिनधास्तपणे परिसरात वावर केला. त्याचवेळी डॉक्टरांच्या वडिलांनी त्या दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी जेवणाचा डबा विसरल्याचे निमित्त काढून तेथून धूम ठोकली. पण काही वेळाने पाटील यांच्या घराच्या पिछाडीस असणारे लोखंडी पाईप्ससह इतर साहित्य त्या दोघा चोरट्यांनी कंपौऊंडवरून पलीकडे मैदानात टाकल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर परिसरात खळबळ उडाल्याचे पाहून चोरटे पसार झाले. दरम्यान, याच चोरट्यांनी परिसरातील उदय बागवडे या वृद्ध दांपत्याच्याही घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी तेथे केबल आॅपरेटर दुरुस्तीसाठी आल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर