संसार सांभाळून करिअरसाठी प्रयत्न करावेत
By Admin | Updated: November 21, 2014 00:33 IST2014-11-21T00:07:53+5:302014-11-21T00:33:11+5:30
उषा थोरात : टी.व्ही. मालिका पाहण्यापेक्षा वृत्तपत्रांचे वाचन करावे

संसार सांभाळून करिअरसाठी प्रयत्न करावेत
वडणगे : संसाराचा गाडा हाकताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते; मात्र कोणत्याही अडचणींना सामना करण्याची जिद्द महिलांनी बाळगली पाहिजे. घर, मुलं आणि संसार सांभाळून करिअरच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या सेवानिवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केले.
वडणगे (ता. करवीर) येथील चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयास भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या सेवानिवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वाचन ही काळाची गरज असून, महिलांनी केवळ टी.व्ही.वरील मालिका पाहण्यापेक्षा वर्तमानपत्रांचे वाचन आणि वृत्तवाहिनी पहाव्यात. असे सांगून बॅँकिंग व्यवहारात महिलांनी जागरूक रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. अपर्णा पाटील यांच्याकडून वाचनालयाच्या कार्याची माहिती घेतली. वाचनालयाच्या सदस्या दीपाली पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्षा पाटील, रजनी दुधाने, अस्मिता देवणे, योगिता पाटील, पुष्पा चोपडे, मंगल पोवार, आदी उपस्थित होत्या. अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले.