इचलकरंजी पालिकेचे खड्डे बुजविण्याऐवजी बॅरिकेडस् लावून संगोपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:25+5:302021-01-13T05:05:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. गेल्या महिनाभरापासून अशा ...

इचलकरंजी पालिकेचे खड्डे बुजविण्याऐवजी बॅरिकेडस् लावून संगोपन
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. गेल्या महिनाभरापासून अशा खड्ड्यांभोवती बॅरिकेडस् लावून नगरपालिकेने वाहनधारकांना धोकादायक खड्ड्यांची सूचना दिली आहे; परंतु ते काम पूर्ण करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात नाही. त्यामुळे हे नगरपालिकेचे पाळीव खड्डे आहेत का? बुजविण्याऐवजी त्यांचे संगोपन केले जात आहे का, असे संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहेत.
शहरातील संभाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर प्रांत कार्यालय चौकात मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्याठिकाणी प्लास्टिकची बॅरिकेडस् लावण्यात आली आहेत. छत्रपती शाहू पुतळा ते तीन बत्तीचौक या मुख्य मार्गावरही मधोमध मोठा खड्डा पडला आहे. तेथे मोठे लोखंडी बॅरिकेडस् लावून ठेवले आहेत, तर शहापूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही मोठी खुदाई करून तो खड्डा तसाच सोडला आहे. त्याच्याभोवती मोठमोठे बॅरिकेडस् लावून ठेवले आहेत. या सर्व ठिकाणांहून वाहनधारकांना अडथळ्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. थोडी नजरचुकी झाल्यास बॅरिकेडस्ला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. अशी धोकादायक परिस्थिती असतानाही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. (फोटो)
१२०१२०२१-आयसीएच-०५
प्रांत कार्यालय चौक
१२०१२०२१- आयसीएच-०६
शहापूर रोड
१२०१२०२१- आयसीएच-०७
शाहू पुतळा रोड (सर्व छाया : उत्तम पाटील)