काशिलिंग आडके कबड्डी संघाचा कर्णधार
By Admin | Updated: May 29, 2015 00:02 IST2015-05-28T23:18:07+5:302015-05-29T00:02:28+5:30
पश्चिम विभागीय आंतरराज्य कबड्डी स्पर्धा होत असून, या संघाच्या कर्णधारपदी काशिलिंग आडके याची निवड करण्यात आली.

काशिलिंग आडके कबड्डी संघाचा कर्णधार
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू काशिलिंग रामचंद्र आडके याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. छत्तीसगड येथे २९ ते ३१ मे दरम्यान पश्चिम विभागीय आंतरराज्य कबड्डी स्पर्धा होत असून, या संघाच्या कर्णधारपदी काशिलिंग आडके याची निवड करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाच्या रवींद्र रमेश कुमावत याचीही या संघात निवड झाली आहे.दोन्ही खेळाडूंना प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील (तात्या) यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्यवाह नितीन शिंदे, राष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवत संघाला विजेतेपद मिळवून देऊ.
- काशिलिंग आडके,
कर्णधार, राज्य कबड्डी संघ.