कँटिनची स्वच्छता; चालकाची वर्तणूक गांभीर्याने घ्या
By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-18T23:46:54+5:302014-12-19T00:12:32+5:30
विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन

कँटिनची स्वच्छता; चालकाची वर्तणूक गांभीर्याने घ्या
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ मुलींच्या वसतिगृहाजवळील कँटिनमधील अस्वच्छता व तेथील चालकाची उर्मट वर्तणूक त्रासदायक ठरत आहे. ही बाब विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, या कँटिनच्या चालकाचे खाद्यपदार्थांच्या दर्जाकडे दुर्लक्ष आहे. स्वच्छता राखली जात नाही शिवाय याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी उर्मट बोलणे, उद्धट वर्तन केले जाते. याबाबतच्या तक्रारीचे निवेदन आस्थापना विभागाला देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. या निवेदनावर विविध विभागांमधील ४० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. याबाबत आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या प्रकरणी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. कॅम्पस्मधील सर्व कँटिनमधील खाद्यपदार्थ, स्वच्छता तपासणीबाबत पाच सदस्यांची समिती नेमली आहे. त्यात तीन प्राध्यापक आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)