शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
5
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
6
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
7
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
8
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
9
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
10
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
11
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
13
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
14
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
15
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
16
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
17
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
18
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
19
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: प्रभागात जोडीला असणार कोण?, उमेदवारांचे आतापासूनच सेटिंग..!

By भारत चव्हाण | Updated: November 29, 2025 18:19 IST

अडीच हजारांवर मते घेण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर लक्ष

भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागले आहेत. ज्या पद्धतीने पक्षीय पातळीवर उमेदवार शोध मोहीम राबविण्यात आली, तशी ती प्रभागनिहाय आपल्यासोबत उमेदवार कोण असावा, यासाठी जोडण्या लावण्यास सुरुवात झाली आहे. निवडून येण्याची शक्यता आहे, अशा उमेदवारांनी आपापसात चर्चेच्या माध्यमातून आराखडे मांडण्यास सुरुवात केली आहे.कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पक्ष या प्रमुख पक्षांसह अन्य छोट्या-छोट्या राजकीय पक्ष व आघाड्यांनी लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने सगळ्याच राजकीय पक्ष नेत्यांनी तयारी केली आहे. प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी, कारभाऱ्यांनी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची प्रभागनिहाय याद्याही तयार केल्या आहेत. पक्षीय पातळीवर इच्छुकांच्या बैठकाही होताना दिसत आहेत.

  • ज्या पद्धतीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत, त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागात आपल्या सोबत अन्य तीन उमेदवार कोण असावेत, यादृष्टीनेही चाचपणी केली जात आहे. प्रभागाची व्याप्ती, मतदारांची संख्या विचारात घेता पूर्वीसारखे हजार दीड हजार मतांच्या गठ्ठ्यावर निवडून येण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • सरासरी चोवीस हजार मतदारांचा समावेश असलेल्या प्रभागातून निवडून येण्यासाठी किमान १० ते ११ हजार मते मिळविणे आवश्यक आहे. पण, तेवढी मते मिळविण्याची एकाही उमेदवाराची व्यक्तिगत क्षमता नाही. त्यामुळे प्रभागातच उमेदवारांमधील लॉबिंगला महत्त्व आले आहे.
  • म्हणूनच, प्रभागात ज्याचे नाव आहे, काम आहे आणि ज्याची अडीच हजारांवर मते मिळविण्याची ताकद आहे अशा उमेदवारांची मोट बांधण्याचा काही प्रभागात प्रयत्न सुरू झाला आहे.
  • एका प्रभागातून चार उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे अडीच ते तीन हजार मते घेणारे उमेदवारच निवडणुकीत जिंकण्याची शक्यता आहे. म्हणूनच, पक्षाबरोबरच स्थानिक उमेदवारांनीही अशा उमेदवारांचा शोध घेऊन लढण्याची तयारी सुरू केली आहे. तुम्ही अमुक पक्षाकडून, आम्ही तमुक पक्षाकडून उभे राहूया, असे वचन दिली जात आहेत.
  • प्रभागात अशा जोडण्या केल्या जाऊ लागल्याने काही इच्छुकांचे कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यायची अद्याप ठरलेले नाही. काही उमेदवारांनी स्वत: उभे राहायचे की पत्नीला उभे करायचे याचाही निर्णय घेतलेला नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ अशी त्यांची मानसिकता झाली आहे. राजकीय पक्षाच्या नेतेही अशा गठ्ठा मतदान घेणाऱ्या उमेेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत.

अशीही संदिग्धता..एकाच प्रभागात एखादी जागा सर्वसाधारण आहे. मग राजकीय पक्ष तिथे कुणाला उभे करणार आणि इतर आरक्षित जागेवर कुणाला, कोणत्या पक्षाला संधी देणार हे अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे आई लढणार की मुलगा, पती लढणार की पत्नी हे देखील निश्चित झालेले नाही. आमच्या घरातील कोणतरी उमेदवार असणार असे गृहित मांडून इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Candidates' ward pairings and settings underway!

Web Summary : Kolhapur's municipal election heats up. Aspiring candidates strategize ward pairings for victory. Alliances are being forged, focusing on candidates with proven voter appeal to secure seats in Kolhapur.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण