Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:48 PM2019-10-04T13:48:33+5:302019-10-04T13:50:47+5:30

काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी गळ टाकून बसलेल्या प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला मात्र अखेरच्या दिवशी आवाडे गटातीलच निष्ठावंतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांना हातकणंगलेतून, तर अविनाश संकपाळ यांच्या पत्नी अर्चना यांना शिरोळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

The candidate for the star of the Awad is fixed | Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चित

Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चित

Next
ठळक मुद्देप्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चितहातकणंगलेतून किरण कांबळे, तर शिरोळमधून अर्चना संकपाळ

कोल्हापूर : काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी गळ टाकून बसलेल्या प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला मात्र अखेरच्या दिवशी आवाडे गटातीलच निष्ठावंतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांना हातकणंगलेतून, तर अविनाश संकपाळ यांच्या पत्नी अर्चना यांना शिरोळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

काँग्रेससह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रकाश आवाडे हे इचलकरंजीतून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हातकणंगले व शिरोळ हे दोन मतदारसंघ मात्र निवडणूक आयोगाकडून नुकतीच अधिकृत नोंदणी मिळालेल्या ताराराणी पक्षाकडून लढविण्याचा निर्णय झाला.

वंचित आघाडीच्या पाठिंब्याने या दोन जागा लढविण्याच्या पर्यायाचीही चाचपणी करण्यात आली; पण हातकणंगलेवरचा हक्क सोडण्यास वंचित तयार नसल्याने ही आघाडी तुटली. अखेर या दोन जागांसाठी अन्य पक्षांतील बंडखोरांना घेऊन चिन्हावर लढवण्याची चाचपणी सुरू होती. यात शिरोळमधून राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगलेतून जनसुराज्यचे राजीव आवळे यांची नावे चर्चेत होती.
 

 

Web Title: The candidate for the star of the Awad is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.