आॅटोरिक्षा परवान्यासाठीच्या जाचक अट रद्द करा
By Admin | Updated: August 9, 2014 00:32 IST2014-08-08T23:18:04+5:302014-08-09T00:32:57+5:30
महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेची मागणी : पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन

आॅटोरिक्षा परवान्यासाठीच्या जाचक अट रद्द करा
इचलकरंजी : आॅटोरिक्षासाठी परवाना देताना शिक्षणाची जाचक अट रद्द करण्याबरोबरच या प्रकरणांची निर्गत ताबडतोब करण्यात यावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन येथील महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, संघटनेचे अध्यक्ष दशरथ मोहिते यांनी रिक्षाचालकांसमोरील अडचणींचा मुख्यमंत्र्यांसमोर उहापोह केला.
आॅटोरिक्षांसाठी सन १९९७ पासून नवीन परवाना देणे बंद झाले होते; पण आता नवीन परवाना देताना शिक्षणाची अट घातली असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, ही अट रद्द करावी. तसेच रिक्षा व टॅक्सीचालकांच्या कल्याण मंडळाबाबतचा अहवाल समितीने मांडला असून, त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांना सांगण्यात आले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, अशी ग्वाही दिली.
शिष्टमंडळामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक कोलप, सल्लागार नंदाताई साळुंखे, अल्ताफ शेख, गजानन बुडके, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)