एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य
By Admin | Updated: October 16, 2015 22:37 IST2015-10-16T22:04:41+5:302015-10-16T22:37:54+5:30
जमदनगी : डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने कृषी मेळावा

एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य
नवे पारगांव : पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केल्यास उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेणे शक्य होईल, असे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. जमदनगी यांनी व्यक्त केले.तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यावतीने कृषी मेळावा व शेती अवजारे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जमदनगी बोलत होते. प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते.डॉ. जमदनगी म्हणाले, ऊसपिकांसाठी संजीवकाच्या पाच फवारण्या, ठिंबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, शास्त्राचा वापर, आदींचा वापर केल्यास ऊस शेती किफायतशीर होईल. डॉ. अशोक पिसाळ, डॉ. धनंजय गायकवाड, डॉ. बी. पी. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप, अंबपचे ऊसभूषण विश्वनाथ पाटील यांची भाषणे झाली. यावेळी ४०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. शहीन देसाई, दिग्विजय मोरे, प्रमोद ननवरे, आकाश माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सी. डी. औताडे- देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)