पट्टणकोडोलीत लसीकरणासाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:30+5:302021-07-14T04:28:30+5:30
पट्टणकोडोली हे गाव हातकणंगले तालुक्याच्या हॉटस्पॉट गावांच्या यादीमध्ये आहे. गावची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात असून, कोरोना रुग्णांची संख्या गावामध्ये ...

पट्टणकोडोलीत लसीकरणासाठी झुंबड
पट्टणकोडोली हे गाव हातकणंगले तालुक्याच्या हॉटस्पॉट गावांच्या यादीमध्ये आहे. गावची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात असून, कोरोना रुग्णांची संख्या गावामध्ये पाचशेच्यावर पोहोचली आहे. लाेकसंख्येच्या तुलनेत गावाला लसीचा पुरवठा अधिक करणे गरजेचे असतानाही सुरुवातीपासून येथे अपुरी लस येत असल्याने अनेकांना लस न घेताचा माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे पट्टणकोडोली गावाला नियमित जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कोट :
लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गोंधळ निर्माण होत आहे. गावासाठी लसीचा पुरवठा अधिक करण्याची गरज आहे. - अंबर बनगे, उपसरपंच, पट्टणकोडोली
फोटो : १३ पट्टणकोडोली लस
ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे.