करवीर तालुका युवक काँग्रेसतर्फे इंधन दरवाढविरोधी सह्यांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:58+5:302021-07-18T04:17:58+5:30
सावरवाडी : केंद्राच्या अवाढव्य करांमुळे इंधन दरवाढ आणि महागाई आकाशाला भिडली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात करवीर तालुका ...

करवीर तालुका युवक काँग्रेसतर्फे इंधन दरवाढविरोधी सह्यांची मोहीम
सावरवाडी : केंद्राच्या अवाढव्य करांमुळे इंधन दरवाढ आणि महागाई आकाशाला भिडली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात करवीर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. बीडशेड (ता. करवीर) येथे पेट्रोलपंपावर केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी शनिवारी सह्यांची मोहीम राबविण्यात आली .
येथील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ रद्द करा, तीन कृषीविरोधी कायदे रद्द करा, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. युवक काँग्रेस संघटनेतर्फे राज्यभरात सह्यांची मोहीम राबवून राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन पाठविण्यात येणार आहे. यावेळी युवक काँग्रेसचे नेते डॉ. लखन भोगम, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, काँग्रेस नेते योगेश कांबळे आदींची भाषणे झाली.
यावेळी दिनकर गावडे, स्वरूप पाटील, योगेश कांबळे, ऋतुराज संकपाळ, तानाजी जाधव, हिंदूराव तिबिले, सचिन पाटील, इंद्रजित पाटील, धोंडिराम जाधव, पंडित कुंभार, संजय लोंढे, नामदेव माने यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
१७ काँग्रेस निदर्शने बीडशेड
बीडशेड (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपानजीक करवीर तालुका युवक काँग्रेसतर्फे शनिवारी केंद्र शासनाने इंधन दरवाढीविरोधी सह्यांची मोहीम राबवून निषेध करण्यात आला.