शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकरी आत्महत्या निवारणासाठी अभियान

By admin | Updated: September 22, 2015 00:10 IST

राजू शेट्टी : महिन्याभरात केंद्र व राज्य शासनाला अहवाल देणार

सांगली : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याबरोबरच आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या निवारण अभियान आम्ही राबविणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनामार्फत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे, मात्र आत्महत्या होऊच नयेत, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कर्जामुळे खचलेल्या व चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा विचार सुरू आहे. राज्यातील विशेषत: विदर्भातील दहा गावांचा सर्व्हे यासाठी करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब तसेच कर्जामुळे अडचणीत आलेले अन्य शेतकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. सविस्तर अभ्यास करून याविषयीचा एक अहवाल आम्ही तयार करणार आहोत. केवळ परिस्थितीचा अहवालच नव्हे, तर त्यामध्ये आम्ही काही उपायसुद्धा सुचविणार आहोत. शेतकऱ्याला आत्महत्याच करावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. दहा वर्षाच्या कालावधीसाठी शेतकऱ्याला कर्ज मिळावे. त्या कर्जावरील व्याज शासन व सामुदायिक सामाजिक दायित्व योजनेतून भागविण्यात यावे. तसेच कर्जाचे संकटकाळात पुनर्गठन झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर मालकी सदरी कोणत्याही बॅँकेचे अगर सोसायटीचे नाव लागता कामा नये. इतर हक्कात वित्तीय संस्थेचे नाव असावे. अशाप्रकारच्या अनेक उपाययोजनांमधून राज्यात शेतकऱ्यांसाठी चांगले वातावरण तयार करता येऊ शकते. येत्या महिन्याभरात आम्ही याबाबतचा अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करणार आहोत. (प्रतिनिधी)सावकार व नातलगांचेच कर्ज अधिकआत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सावकार व नातवाईकांकडून कर्ज घेतले होते. सावकारी तगादा असह्य होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे बॅँकांकडून शेतकऱ्यांना सहजरित्या कर्जपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. ‘नाम’ला पाठिंबा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या फाऊंडेशनचा उपक्रम चांगला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यास पाठिंबा आहे. आत्महत्या होऊच नयेत म्हणून आम्ही जी मोहीम हाती घेणार आहोत, त्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले.पदांसाठी वाट पाहूघटकपक्षांनी सत्तेतील सहभागासाठी यापूर्वी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर कोणतीही बैठक झाली नाही. मात्र आम्ही सरकारला यासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पदांसाठी आताच कोणताही आमचा आग्रह नाही. योग्यवेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी म्हणाले.