मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:32+5:302021-05-19T04:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण व कोरोना महामारी यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार ...

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण व कोरोना महामारी यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पत्राद्वारे केली.
देशात कोरोना महामारीचे संकट असताना मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वेाच्च न्यायालयाने निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजातील तळागाळातील वंचित असणाऱ्या तरुण-तरुणींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तरुणांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाच्या वेदना लक्षात घेऊन केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा व यासह देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पत्राद्वारे केली.