करवीर तालुक्यात मध्यम पावसाने तारांबळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:26+5:302021-01-09T04:20:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : गेली दोन दिवस पावसाने मध्यम व मुसळधार हजेरी लावल्याने साखर कारखान्यांच्या ऊसतोडी अडचणीत आल्या ...

करवीर तालुक्यात मध्यम पावसाने तारांबळा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : गेली दोन दिवस पावसाने मध्यम व मुसळधार हजेरी लावल्याने साखर कारखान्यांच्या ऊसतोडी अडचणीत आल्या आहेत. गुऱ्हाळघरे बंद करण्याची वेळ आली आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिला तर मात्र साखर कारखान्याचा गाळप हंगाम कमी क्षमतेने अथवा बंद करण्याची वेळ येणार आहे. सोमवारपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण व पावसाची कधी जोरदार, तर कधी तुरळक अशी जून, जुलै महिन्यांत निर्माण होणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पुन्हा सकाळपासून महाबळेश्वर, दार्जिलिंगसारखी ढगाळ वातावरणासह दाट पावसाळी धुक्याची परिस्थिती आहे. दुपारी चार वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली. यामुळे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीमध्ये व्यत्यय येत आहे. उसाच्या सऱ्यांमध्ये पाणी तुंबले आहे, तर पावसाच्या पाण्याने चिखल झाल्याने ऊस वाहतूक करण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पावसाने जळण भिजल्याने गुऱ्हाळघरांसमोर मोठ्या अडचणी आहेत. शिल्लक जळणावर सध्या गुऱ्हाळघरे सुरू ठेवावी लागत आहेत असाच जर आणखी दोन दिवस पावसाने सुरुवात ठेवली तर कारखान्याचे हंगाम बंद ठेवावे लागणार आहेत. रब्बी पिकावरही किडीचा प्रादुर्भाव दिसणार आहे.
(फोटो) १)पावसातच बैलगाडीवान कारखान्याला ऊस घेऊन जाताना. २) जळणाचा शिल्लक साठा संपत आल्याने दिवसभरात चार आदणं काढण्याऐवजी एकदोन आदण काढण्यावर भर.