शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शिवाजी पुलावरील केबल पेटली,मधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:52 AM

कोल्हापूर : येथील शिवाजी पुलावरून गेलेल्या एका वृत्तवाहिनीची केबल शॉर्टसर्किटने पेटल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ...

ठळक मुद्देशिवाजी पुलावरील केबल पेटलीमधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ

कोल्हापूर : येथील शिवाजी पुलावरून गेलेल्या एका वृत्तवाहिनीची केबल शॉर्टसर्किटने पेटल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. दरम्यान, पाण्याच्या फवाऱ्याने पुलाखाली बसलेले मधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. या प्रकाराने काहीवेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.शिवाजी पुलावरून अनेक केबल गेल्या आहेत. एका खासगी वृत्तवाहिन्याच्या केबलला सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहनधारकांच्यात भीती पसरली.

नेमकी कशाला आग लागली हे पाहण्यासाठी नागरिक पुलावर थांबून पाहू लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली. केबलला आग लागल्याने नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. अधिकारी तानाजी कवाळे, जवान शिवाजी खेडकर, सर्जेराव लोहार, जयवंत डकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाण्याचा फवारा मारून आग विझवली. दरम्यान, पुलाखाली बसलेले मधाचे पोळे उठून मधमाशा रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. 

 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर