सी. ए. फौंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST2021-02-19T04:15:07+5:302021-02-19T04:15:07+5:30

कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांनी सी. ए. फौंडेशन परीक्षेत यश मिळवले आहे. नोव्हेंबर ...

C. A. Success of DYP Junior College in Foundation Examination | सी. ए. फौंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

सी. ए. फौंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांनी सी. ए. फौंडेशन परीक्षेत यश मिळवले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट (आयसीएसआय) तर्फे चार्टर्ड अकाैंटंट अभ्यासक्रमासाठी ही फौंडेशन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या नंदन गंभीर, रेणू हिंगे, सर्वेश जोशी, सुजय जाधव, केतकी पटेल या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. हे विद्यार्थी आता सी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. पाटील व वाणिज्य विभागाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.

............... फोटो:

Web Title: C. A. Success of DYP Junior College in Foundation Examination