कोल्हापूर : सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १ रुपया ६९ पैशाची वाढ करून ती प्रती लिटर ५७ रुपये ९७ पैसे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. याचवेळी उसाच्या रसापासून बनणाऱ्या तसेच बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणऱ्या इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत इथेनॉल दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री आश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा नवी दिल्ली येथे केली. सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची दरवाढ २०२४-२५ च्या साखर हंगामासाठी लागू राहील. येत्या ३१ ऑक्टोबरला चालू हंगाम संपेल.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २०३० पर्यंत लांबणीवरचाल हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने २०३० पर्यंत पुढे ढकलले आहे. चालू वर्षात पेट्रोलमध्ये १८ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न तेल कंपन्यांनी सुरू केले असल्याचे एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.