स. ब. खाडे महाविद्यालयात ‘बेसिक्स इन सिंगिंग अँड म्युझिक’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:51+5:302021-07-01T04:16:51+5:30
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय गायक प्रल्हाद पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गायन कलेचा फायदा करून घ्यावा आणि आत्मविश्वासाने आपली कला ...

स. ब. खाडे महाविद्यालयात ‘बेसिक्स इन सिंगिंग अँड म्युझिक’ कार्यशाळा
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय गायक प्रल्हाद पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गायन कलेचा फायदा करून घ्यावा आणि आत्मविश्वासाने आपली कला सादर करावी, असे आवाहन केले.
भारतीय संगीताला फार मोठी परंपरा असून युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ असल्याचे सांगितले. चांगला कलाकार घडणे महत्त्वाचे असून कलेच्या माध्यमातून चांगल्या लौकिक घडवावा, असे सांगितले. गंधार वाद्यवृंदचे प्रा. निशांत गोंधळी यांनी शब्द, सुर, ताल, गाण्याची निवड याला सादरीकरणात महत्त्व असल्याचे सांगितले. त्यांनी गझल, लोकगीत, कव्वाली, भावगीत आणि इतर गीते सादर केली.
उद्घाटक सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांनी विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभाग घेऊन आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन केले.
या वेळी प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रा. एस. पी. चौगले यांनी केले. प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर यांनी मनोगत व्यक्त केले.