चिकोडी विधानसभेसाठी २१ आॅगस्टला पोटनिवडणूक

By Admin | Updated: July 21, 2014 00:39 IST2014-07-21T00:35:59+5:302014-07-21T00:39:55+5:30

२५ आॅगस्टला मतमोजणी

Bye Election to Chikodi Legislative Assembly on August 21 | चिकोडी विधानसभेसाठी २१ आॅगस्टला पोटनिवडणूक

चिकोडी विधानसभेसाठी २१ आॅगस्टला पोटनिवडणूक

निपाणी : मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभा निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. त्यामुळे चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातील पद रिक्त झाले होते. त्यासाठी आता २१ आॅगस्टला मतदान होणार असून, २६ जुलैपासून अधिसूचना जाहीर होणार आहे. २५ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २६ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. २ आॅगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ४ रोजी छाननी, ६ आॅगस्टला माघार आणि २१ रोजी मतदान होऊन २५ रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. ऐन पावसाच्या धामधुमीत ही पोटनिवडणूक लागल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.या पोटनिवडणुकीसाठी चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे खासदार प्रकाश हुक्केरी यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी, भाजपतर्फे चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष आण्णासाहेब ज्वोल्ले, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि बसपतर्फे नागेश किवड यांची नावे चर्चेत आहेत.

Web Title: Bye Election to Chikodi Legislative Assembly on August 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.