शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..तोपर्यंत भाजपाचे काम करणे पुर्ण बंद, आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही कार्यकर्त्यांचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:52 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत कामबंद ठेवण्याचा निर्णय भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत कामबंद ठेवण्याचा निर्णय भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही नव्या पदाधिकारी निवडीबद्दल उद्रेक समोर आला. येथील मल्हार हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद झाली.माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे म्हणाले, पक्षासाठी त्याग केला. संघटना उभी केली. परंतु, नव्याने आलेल्यांना पदे देण्यात आली. हे योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही जुन्या कार्यकर्त्यांची फरफट होत आहे.माजी तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी म्हणाले, ३२ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले. यापुढेही काम करत राहू. निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे, नव्या नियुक्त्या मान्य नाहीत. माजी शहराध्यक्ष रमेश रिंगणे म्हणाले, मर्जीतील लोकांना खिरापतीसारखे पदे वाटण्यात आली आहेत. निष्ठावंतावर अन्याय झाल्यामुळेच तालुक्यातील भाजपाची स्थिती वाईट आहे. तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत म्हणाले, मर्जीतील लोकांनाच पदे देऊन पक्षाची घटना मोडीत काढण्यात आली. माजी शहराध्यक्ष आनंद पेडणेकर म्हणाले, नव्या निवडी घटनाबाह्य आहेत. आजपर्यंत असे कधीच घडले नाही.विस्तारक संदीप नाथबुवा म्हणाले, व्यक्तीपेक्षा पक्षच श्रेष्ठ आहे. अंतर्गत कुरघोडी थांबली नाही तर संघटनेला धोका आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवल्या जातील. यावेळी विठ्ठल भमानगोळ, अनिल गायकवाड, बी. एस. पाटील, अजित जामदार, संदीप कुरळे, पुंडलिक कुराडे आदींसह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाPoliticsराजकारण