शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:14 IST

सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देसांगलीतील सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्यामाळी कॉलनी, टाकाळा येथील घटना

कोल्हापूर : सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाऱ्याने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी तेल उद्योगासाठी सावकारांच्याकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.

व्यवसायात आर्थिक मंदी आल्याने ते पैसे परत करु शकले नाही. त्यामूळे सावकारांनी त्यांचेकडे वारंवार तगादा लावला होता. ‘आमचे पैसे दे नाही तर, आत्महत्या कर’, अशी धमकी सावकारांनी दिली होती, अशी चिठ्ठी पोलीसांना मिळून आली आहे.अधिक माहिती अशी, उमेश बजाज व त्यांच्या भावाने सांगलीतील माधवनगर भागात खाद्य तेलाचा उद्योग सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी सांगलीतील काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैशाची उचल केली होती. धद्यांत मंदी असल्याने त्यांना पैसे परत करता आले नाही. सहा महिन्यांपासून सावकारांनी मुद्दल व व्याजाची रक्कम परत देण्यासाठी तगादा लावला होता.

बजाज बंधूंनी आमच्याकडे पैसे नाहीत, मात्र पैशाची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला पैसे देतो असे सांगितले होते. मात्र सावकारांनी पैशासाठी त्यांचेकडे सतत तगादा लावल्याने ते नेहमी चिंतेत असत. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण उठले. उमेश दिसून आले नाहीत त्यामूळे घरातील लोकांना ते बाहेर फिरायला गेले असावे असे वाटले.

बराच वेळ झाला ते घरी न आल्याने शोधाशोध सुरु केली. यावेळी त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर लोखंडी गजाला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडीलांना अशा अवस्थेत पाहून त्याने आरडाओरड केली. घरातील व शेजारील लोक धावत वरती आले. त्यानंतर राजारामपूरी पोलीसांना कळविण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह सीपीआरच्या शवगृहात पाठवला आहे. त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय कुटूंबियांनी घेतला आहे. त्यांचे आई-वडील मुंबईला आहेत. ते कोल्हापूरात आलेनंतर शवविच्छेदन केले जाणार आहे. यावेळी मृत उमेश यांच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये सांगलीतील सावकारांनी पैशासाठी तगादा लावला होता.

दोघा भांवापैकी एकाने आत्महत्या करा, आम्ही तुमचे पैसे माफ करतो, असे उल्लेख चिठ्ठीमध्ये मिळून आला आहे. ती पोलीसांनी जप्त केली. उमेश यांच्या आत्महत्याने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

चिठ्ठीची चौकशी करुन गुन्हामृत उमेश बजाज यांच्या आत्महत्येसंबधी सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीची सत्यता पडताळून संबधीत सावकारांची चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल.औदूंबर पाटील : पोलीस निरीक्षक, राजारामपूरी पोलीस ठाणे

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूरSangliसांगली