भेंडवडेत स्वखर्चाने उभारले बस स्टँड निवारा शेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:20+5:302021-01-17T04:21:20+5:30
भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे अनेक वर्षांपासून एसटी थांब्याजवळ निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. याठिकाणी अखेर डॉ. देसाई ...

भेंडवडेत स्वखर्चाने उभारले बस स्टँड निवारा शेड
भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे अनेक वर्षांपासून एसटी थांब्याजवळ निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. याठिकाणी अखेर डॉ. देसाई यांनी शेड उभारले. याच्या उदघाटनप्रसंगी माने बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच काकासो चव्हाण होते.
यावेळी वीरसेवा दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, वारणा बँकेचे संचालक प्रकाश माने, दिलीप पाटील, सुहास देसाई, सुनील देसाई, विनोद देसाई, लालसिंग पाटील, लालासो देसाई, अजित देसाई, राजेंद्र मालगावे, प्रितेश देसाई, राहुल पाटील, अजित पाटील, शैलेश देसाई, शांतीनाथ देसाई, वैभव देसाई, सलीम मुल्ला उपस्थित होते.
फोटो ओळी-
भेंडवडे येथे एसटी बस निवारा शेडचे उद्घाटन अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संजय देसाई, अरुण पाटील, लालसिंग पाटील, विनोद देसाई, काकासो चव्हाण उपस्थित होते.