बेळगावात बसवाहकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:36 IST2019-07-08T00:36:22+5:302019-07-08T00:36:27+5:30
बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या (केएसआरटीसी) दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने बसवाहकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ...

बेळगावात बसवाहकाची आत्महत्या
बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या (केएसआरटीसी) दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने बसवाहकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आनंद हरिजन (वय ५३, रा. केदनूर, बेळगाव) असे आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येला जबाबदार धरत दोन अधिकाऱ्यांना केएसआरटीसीने निलंबित केले आहे. सहाय्यक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस. एम. मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल. एस. लाठी अशी अधिकाºयांची नावे आहेत.
याबाबची माहिती अशी, वरिष्ठ अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून बेळगाव ‘केएसआरटीसी’च्या दुसºया बसडेपोत कार्यरत असलेल्या आनंद हरिजन या बस कंडक्टरने गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आनंद यांनी सुसाईड नोटमध्ये ज्या अधिकाºयांनी त्रास दिला त्यांची नावे लिहून ठेवली होती. त्यामुळे जोपर्यंत त्या अधिकाºयांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि समाज, संघटनांनी घेतला. याबाबत बसस्थानकावर संघटनेचे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सुरू असताना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत मृतदेह बसस्थानकात ठेवत नेत्यांनी आंदोलन केले.
याप्रकरणी दुपारी एक वाजता सहाय्यक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस. एम. मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल. एस. लाठी या दोघा अधिकाºयांना निलंबित केल्यावर नातेवाईकानी आंदोलन मागे घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.