जयसिंगपुरात नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST2021-08-25T04:28:58+5:302021-08-25T04:28:58+5:30

राणे यांना महाराष्ट्रात फिरायचे मुश्किल करू, असा इशारा तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी दिला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, ...

Burning of a symbolic statue of Narayan Rane at Jaysingpur | जयसिंगपुरात नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

जयसिंगपुरात नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

राणे यांना महाराष्ट्रात फिरायचे मुश्किल करू, असा इशारा तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी दिला.

यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, मधुकर पाटील, सतीश मलमे, आण्णासाहेब बिलोरे, नगरसेवक पराग पाटील, तेजस कुराडे यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यानंतर राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी शंखध्वनी करून घोषणाबाजी केली.

यावेळी विकास सुतार, किरण देसाई, सूरज भोसले, पं. स. सदस्य संजय माने, बाबूराव ऐनापुरे, स्वाधीन कांबळे, रेखा जाधव, माधुरी टाकारे, अर्चना भोजणे, रंजना चौगुले, मनिषा पवार, साजिदा घोरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो - फोटो - २४०८२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Web Title: Burning of a symbolic statue of Narayan Rane at Jaysingpur