मलकापूर : शेतीसह प्लंबिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पाईपचे गोदाम व ट्रक बॉडी वर्कशॉपला भीषण आग लागून तीन नवीन ट्रकसह गोदाममधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत घाऊक विक्रेत्यांच्या मालांसह तीन ट्रक व मशिनरींचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. येथील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अग्निशामकच्या चार बंबांच्या साह्याने पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील वारणा हॉटेल पाठीमागे शास्त्रीनगर परिसरात कऱ्हाडमधील रशिद अहंमद अरब यांच्या मालकीचा घाऊक विक्रीचा व्यवसाय आहे. ते प्लंबिंगसाठी लागणारे सर्व साहित्य व शेतीसाठी लागणाऱ्या विविध कंपन्यांच्या पाईप विक्रीचा व्यवसाय गेली अकरा वर्षांपासून करतात. येथील वारणा हॉटेल पाठीमागे शास्त्रीनगर परिसरात तीन गुंठ्याच्या शेडमध्ये त्यांचे साहित्याचे गोदाम आहे. याच गोदामशेजारी जमीर मांगलेकर यांच्या मालकीचे ‘गोल्डन ट्रक बॉडी बिल्डर’ नावाचे शॉप आहे. जमीर मांगलेकर हे चार-पाच वर्षांपासून येथे ट्रकच्या बॉडी बांधण्याचे काम करतात.शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रशिद अरब व जमीर मांगलेकर हे नेहमीप्रमाणे आपापले व्यवसाय बंद करून घरी निघून गेले तर कामगार गॅरेजमध्ये झोपले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना कामगाराला उष्णता जाणवली. अंगाला गरम चटके बसल्याने तो जागा झाला. त्यावेळी गॅरेजला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्या कामगाराने केबीन तोडून स्वत:चा जीव वाचवला. तत्काळ त्याने गॅरेज मालकाला ही खबर दिली. आसपासच्या नागरिकांनाही त्याने उठविले. तोपर्यंत गोदामसह गॅरेजमधील ट्रक व साहित्याने पेट घेतला. सर्वत्र प्लास्टिकचेच साहित्य असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यासह अग्निशमन दलाला घटनेची खबर दिली. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच कृष्णा कारखाना, कृष्णा रुग्णालय, कऱ्हाड पालिकेचे अग्निशमन पथक त्याठिकाणी पोहोचले. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत मांगलेकर यांच्या गॅरेजमधील तीन ट्रकसह मशीन, बॉडी बांधण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, शेड जळून पन्नास लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. तर रशिद अरब यांच्या गोदाममधील सर्व प्रकारच्या पाईप, प्लंबिंगचे साहित्य, स्पेअर पार्ट, शेड, शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या रोल पाईप व तीन गुंठ्यातील शेड जळून खाक झाले. त्यामध्ये त्यांचे साठ लाखांहून अधिक नुकसान झाले. (वार्ताहर)काम सुरू असतानाच ट्रक खाकजमीर मांगलेकर यांच्या ‘गोल्डन ट्रक बॉडी बिल्डर’ शॉपमध्ये तीन ट्रकच्या चॅसीस बॉडी बांधण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. संबंधित चॅसीस शेवाळेवाडी येथील संजय पवार, सोलापूर येथील रियाज शेठ व रहिमतपूर येथील आजीम पठाण यांच्या मालकीच्या होत्या. या तिन्ही चॅसीसच्या बॉडी बांधण्याचे कामही सुरू होते. मात्र, शनिवारी रात्री लागलेल्या आगीत तिन्ही चॅसीस खाक झाल्या. काम सुरू असतानाच ट्रक खाकजमीर मांगलेकर यांच्या ‘गोल्डन ट्रक बॉडी बिल्डर’ शॉपमध्ये तीन ट्रकच्या चॅसीस बॉडी बांधण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. संबंधित चॅसीस शेवाळेवाडी येथील संजय पवार, सोलापूर येथील रियाज शेठ व रहिमतपूर येथील आजीम पठाण यांच्या मालकीच्या होत्या. या तिन्ही चॅसीसच्या बॉडी बांधण्याचे कामही सुरू होते. मात्र, शनिवारी रात्री लागलेल्या आगीत तिन्ही चॅसीस खाक झाल्या.
तीन नवीन ट्रकसह वर्कशॉप भस्मसात
By admin | Updated: March 23, 2016 00:23 IST