शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावमध्ये दीड लाखांची घरफोडी, आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 14:02 IST

Crimenews Kolhapur : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला.

ठळक मुद्दे पाचगावमध्ये दीड लाखांची घरफोडी, आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न मालक झोपले पहिल्या मजल्यावर तळमजल्यात चोरट्यांनी केले हात साफ

कोल्हापूर : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला.

पाचगाव (ता. करवीर) येथील सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये रोकड व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत गुरुदत्त प्रकाश शिंदे यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, पण तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समजते.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथे सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये गुरुदत्त शिंदे हे राहतात. शनिवारी मध्यरात्री जेवण करुन सहकुटुंब ते पहिल्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

आतील तिजोरीतील दीड तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार, पुष्कराज खडा असलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी, पाचूचा खडा असलेली साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅमची सोन्याची नथ तसेच साडेआठ हजाराची रोकड असा सुमारे १ लाख ५४ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

शिंदे हे सकाळी उठल्यानंतर तळमजल्यावर आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले, त्यांनी आत जाऊन पाहिले असता तिजोरीसह कपाटातील कपड्यासह इतर साहित्य विस्कटले होते. त्यानंतर घरफोडीचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, करवीर पोलीस ठाण्यातील सपोनि विवेकानंद राळेभात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

डॉग स्कॉट व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते, पण चोरट्यांचा माग निघाला नाही. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद झाली आहे. दरम्यान, याच परिसरात चोरट्यांनी आणखी दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर