शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या निवडणुकीचे कोल्हापूर ‘गोकुळ’वर ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:56 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो, यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले.

ठळक मुद्देसुपरवायझरना लावले काम : गावोगावची माहिती करा संकलित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो, यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले. संघाच्या सुपरवायझरना गावोगावची निवडणुकीत उपयोगी पडू शकेल अशी राजकीय माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी चक्क सहा पानांचा फॉर्मच दिला आहे. हा एक फॉर्म भरतानाही चांगलाच घाम फुटेल, इतकी माहिती त्यात विचारली आहे.

संघाचे नेते समजले जाणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल हा भाजपचा आमदार आहे. पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माजी आमदार पी. एन. पाटील हे करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुतणे चंद्रदीप नरके शिवसेनेचे आमदार आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई तसेच संजयबाबा घाटगे हे विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत; परंतु साºया जिल्'ातून इतकी तपशीलवार माहिती गोळा करण्यामागे खासदार महाडिक यांची लोकसभेची निवडणूक असण्याची शक्यता जास्त आहे.

अन्य इच्छुक इतक्या पद्धतशीरपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आजवरचा अनुभव नाही. ‘गोकुळ’ने ही माहिती ‘एनडीडीबी’ला हवी आहे, असे कारण पुढे केले आहे. गेल्या शनिवार (दि. २५) पासून ती गोळा केली जात आहे. त्यामुळे ही माहिती नक्की कशासाठी संकलित केली जात आहे, हे जाहीर करण्याची जबाबदारी आता संघाच्या नेतृत्वाची व व्यवस्थापनाची आहे.

दूध संघाच्या कामासाठी ही माहिती हवी असती तर ती फक्त दूध संस्थांपुरतीच मर्यादित राहिली असती; परंतु तसे घडलेले नाही. या माहितीमध्ये गावाचे नाव, ग्रामदैवत, यात्रा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेचा मतदार संघ कोणता हे विचारण्यात आले आहे. त्याशिवाय सत्तास्थानेमध्ये सेवा सोसायट्या, पाणीपुरवठा संस्था, दूधसंस्था, पतसंस्था, शिक्षणसंस्था व त्यांच्या प्रमुख पदाधिकाºयांचे संपर्क नंबर संकलित करण्याच्या सूचना आहेत. गावांतील सहकारी बँकांतील आजी-माजी पदाधिकाºयांची आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. त्या गावांतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शेकाप, जनसुराज्य, जनता दल, रामदास आठवले गट, प्रा. जोगेंद्र कवाडे गट, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, बसप आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांची नावेही संकलित केली जाणार आहेत. त्याशिवाय संबंधित गावाच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत त्या लिहिण्यासाठी तब्बल एक पानच दिले आहे. एवढी सविस्तर माहिती ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’सारखी नामांकित संस्थाही कधी गोळा करीत नाही. या माहितीची दूध संघाला गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सरासरी १० गावेसंघाकडे सध्या सुमारे १७५ सुपरवायझर आहेत. त्यांना प्रत्येकी ९ ते १० गावांची ही माहिती गोळा करावी लागणार आहे. पदाधिकाºयांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा करताना तोंडाला चांगलाच फेस येत असल्याची प्रतिक्रिया एका सुपरवायझरने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.निवडणूक निधीही!मध्यंतरी राधानगरी तालुक्यातील एका संचालकाने मी तुम्हांला नोकरी लावले म्हणून कर्मचाºयांच्या बोनसमधून काही रक्कम विधानसभेच्या निवडणुकीसाठीच कपात करून घेतली होती.व्यवस्थापनाचा संपर्क नाहीदरम्यान, या माहितीबाबत संघाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.