बुरंबाळी ग्रामपंचायत बिनविरोधला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:41+5:302020-12-31T04:23:41+5:30

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : गेले कित्येक दिवस चर्चेच्या फेऱ्यांतून बुरंबाळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न केले; ...

Burambali Gram Panchayat lost unopposed | बुरंबाळी ग्रामपंचायत बिनविरोधला खो

बुरंबाळी ग्रामपंचायत बिनविरोधला खो

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : गेले कित्येक दिवस चर्चेच्या फेऱ्यांतून बुरंबाळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण स्थानिक नेतेमंडळींनी कस लावूनही ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे ‘ग्रामपंचायत बिनविरोध’ला खो बसला. तरीही दोन प्रभाग बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना यश आले असून प्रभाग तीनमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच जोरदार प्रयत्न सुरू होते. बुधवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी याला वेगळीच कलाटणी मिळाली. चर्चेच्या फेऱ्या अखेरच्या क्षणी फिसकटल्याने केवळ एका प्रभागात निवडणूक लागणार हे स्पष्ट झाले; तर क्रमांक दोन व तीन हे प्रभाग बिनविरोध करण्यात स्थानिक नेतेमंडळींना यश आले .

दोन नंबर प्रभागातून लता अनिल आर्डेकर (ओबीसी महिला) व माधवी विष्णू चौगले (सर्वसाधारण महिला) तर प्रभाग क्रमांक तीनमधून शुभांगी अमोल देवार्डेकर (सर्वसाधारण महिला), जावेद रहिमतुल्ला मोमीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Burambali Gram Panchayat lost unopposed