कागल पालिकेचा थकबाकीदारांना दणका

By Admin | Updated: May 11, 2016 00:54 IST2016-05-10T22:51:05+5:302016-05-11T00:54:57+5:30

नोटिसा लागू : ९० दिवसांच्या आत घरफाळा, पाणी बिल न भरल्यास दरमहा दोन टक्के दराने व्याज आकारणी

Bunch of Kagalapalik's bankruptcies | कागल पालिकेचा थकबाकीदारांना दणका

कागल पालिकेचा थकबाकीदारांना दणका

जहांगीर शेख -- कागल --पाणीपट्टी-घरफाळा करांची बिल आकारणी करून संबंधित मिळकतधारकास नोटिसा पाठविलेल्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत त्यांनी ही रक्कम न भरल्यास त्या रकमेवर दरमहा दोन टक्के व्याज म्हणजे वार्षिक २४ टक्के व्याज आकारणी कागल नगरपरिषद करणार आहे. या महिनाअखेर सर्व मिळकतधारकांना अशा नोटिसा लागू केल्या जाणार आहेत.व्याज आकारणी करण्याबाबतची ही नियमावली महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये केली आहे. त्याला कायदेशीर मान्यता आहे. राज्यातील अनेक नगरपालिकांनी याची अंमलबजावणी यापूर्वी केली आहे. कागल नगरपरिषदेने सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल २०१६ पासून व्याज आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वर्ष-दोन वर्षे घरफाळा, पाणीपट्टी इतर करांची रक्कम थकवून नंतर भरली तरी व्याज देण्याचा विषय नव्हता. आज मात्र जर पाणीपट्टी, घरफाळा थकविला, तर दरमहा दोन टक्के रक्कम जादा द्यावी लागणार आहे. कागल शहरात आठ हजार तीनशे मिळकतधारक आहेत. तर पाच हजार सहाशे नळ कनेक्शनधारक आहेत. करआकारणी करताना घरफाळा हा ज्या परिसरात घर आहे त्यावरून प्रती चौरस फूट आकारला जातो. हा प्रती चौरस फूट दर ज्या त्या परिसरावरून दोन रुपये ते १५ रुपये असा आहे. त्यामुळे घरफाळा थकबाकी ठेवणे आता कागलकरांना परवडणार नाही. जर ९० दिवसांच्या आत ही रक्कम भरली, तर एक टक्के रकमेची सूटही मिळणार आहे. म्हणजे वेळेत रक्कम भरणाऱ्या लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. २०१५-२०१६ मध्ये ९३ टक्के इतकी वसुली झाली आहे. ७ टक्के वसुली झालेली नाही. त्यामध्ये हद्दवाढीस आलेल्या क्षेत्रातील मिळकतधारकांनी सोयी सुविधा नाही तर कर का भरायचा? असा पवित्रा घेतल्याने ही थकबाकी आहे. थकबाकीसाठी व्याज आकारणी करण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा देण्याचे काम मे महिनाअखेर सुरू होणार आहे.

मीटर रीडिंगप्रमाणे पाणीपट्टी
शहरातील सर्व चाव्यांना मीटर बसविली आहेत. आता एप्रिल मे महिन्याचे मीटर रीडिंग घेऊन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चावीधारकांना बिले दिली जाणार आहेत. ज्यांच्याकडे मीटर नाही किंवा परस्पर बंद केले आहे, त्यांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Bunch of Kagalapalik's bankruptcies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.