‘बुलेट’चा मानकरी आज ठरणार

By Admin | Updated: November 30, 2015 01:07 IST2015-11-30T00:44:30+5:302015-11-30T01:07:14+5:30

लाखोंची बक्षिसे : ‘लोकमत’ दीपोत्सव महाबंपर लकी ड्रॉची सोडत; वाचकांमध्ये उत्सुकता

'Bullet' will be decided today | ‘बुलेट’चा मानकरी आज ठरणार

‘बुलेट’चा मानकरी आज ठरणार

कोल्हापूर : व्यावसायिकांना दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरातीद्वारे आपल्या उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावी व ग्राहकांचा खरेदीचा आनंद लाखोंच्या बक्षिसांनी द्विगुणित व्हावा या दुहेरी उद्देशाने राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजना आयोजित केली होती.
या योजनेच्या ‘महाबंपर लकी ड्रॉ’ची सोडत आज, सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. बंपर बक्षीस ‘बुलेट’ मोटारसायकलसह लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ‘महाबंपर लकी ड्रॉ’ सोडतीसोबतच आयोजित मराठी अभिनेता संदीप पाठक यांचे
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री विनोदी नाटकाचा प्रयोग उपस्थितांसाठी पर्वणी ठरणार आहे.
‘महाबंपर लकी ड्रॉ सोडती’वेळी मान्यवर, प्रायोजक, ग्राहक, विक्रेते, वाचक, आदींची उपस्थिती असणार आहे. दि. १३ आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही योजना घेण्यात आली. त्यात ग्राहकांनी ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजनेतील सहभागी व्यावसायिकांच्या दुकानांतून वस्तूंची खरेदी केल्यावर त्यांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या योजनेतील ‘दसरा’ व दिवाळीपूर्वी दोन लकी ड्रॉ काढले. त्यानंतर ही ‘महाबंपर लकी ड्रॉ’साठीची सोडत आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अ‍ॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीटस् हे प्रायोजक आहेत.

भाग्यवान विजेत्यांना मिळणार अशी बक्षिसे
या योजनेतील ‘बंपर प्राईज ड्रॉ’ विजेत्याला बुलेट ही मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे. तसेच बंपर ड्रॉतील प्रथम क्रमांक विजेत्याला एलडी टीव्ही, द्वितीय क्रमांकाच्या तीन विजेत्यांना ९ हजार ९९९ रुपयांचे सोने, तृतीय क्रमांकाच्या सहा विजेत्यांना वॉटर प्युरिफायर, चौथ्या क्रमांकाच्या सहा विजेत्यांना होम थिएटर, पाचव्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना मायक्रो ओव्हन, सहाव्या क्रमांकाच्या नऊ विजेत्यांना डिजिटल कॅमेरा, सातव्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना इंडक्शन कुकर, आठव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना मोबाईल आणि नवव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना इस्त्री बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त लकी ड्रॉंंमधून उत्तेजनार्थ बक्षिसेही ग्राहकांना जिंकण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: 'Bullet' will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.