...तर बळिराजा समृद्ध होईल
By Admin | Updated: November 21, 2015 00:15 IST2015-11-20T20:49:15+5:302015-11-21T00:15:45+5:30
विनायक राऊत : किर्लोस कृषी विज्ञान रब्बी मेळाव्याचा समारोप

...तर बळिराजा समृद्ध होईल
मालवण : कोकणच्या विकासात शेतीक्षेत्राचे स्थान मोठे आहे. दूध, अंडी, फळभाज्या व अन्य शेती उत्पादनात परावलंबी असलेल्या सिंधुदुर्गला स्वावलंबी आणि समृद्ध बनविण्यासाठी शेतीक्रांती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून व्यावसायिक शेतीकडे वळली पाहिजे. व्यावसायिक शेतीतून येथील शेतकरी राजा नक्कीच समृद्ध होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
भारतीय कृषी संशोधन परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे आयोजित तीन दिवसीय रब्बी मेळावा-कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची सांगता झाली. यावेळी अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कल्याण-डोंबिवली नगरसेवक दशरथ घाडीगावकर, सुवर्ण कोकणचे सतीश परब, नगरसेवक गीते, संचालक बंडू सावंत, बाळासाहेब परुळेकर, नितीन सावंत, विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते.
महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस, चिपी विमानतळ, कोस्टल रोड, कराड चिपळूण मार्गासह होणारा कोल्हापूर सोनवडे घाटमार्ग या मेगा प्रकल्पामुळे येत्या तीन वर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा नकाशा निश्चितच बदललेला असेल. कोकण विकासाच्या राजमार्गावर स्वार होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावा
सुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले.