बांधकाम परवानगी, भोगवट्यासाठी शुक्रवारी विशेष शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:25+5:302021-07-14T04:27:25+5:30
कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील नगर रचना कार्यालयात येत्या शुक्रवारी (दि.१६) बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन ...

बांधकाम परवानगी, भोगवट्यासाठी शुक्रवारी विशेष शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील नगर रचना कार्यालयात येत्या शुक्रवारी (दि.१६) बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पात्र प्रकरणाची बांधकाम परवानगी, भोगवट्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार ५ मे २०२१ पासून नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी, भोगवटा व विकासकामांची मंजुरी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. यापूर्वी दाखल करण्यात आलेली बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने देण्याचे कामकाज सुरू होते. त्यामुळे जी प्रकरणे ५ मे २०२१ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने नगररचना विभागाकडे आली आहेत. अशा प्रकरणांची बांधकाम परवानगी, भोगवट्याची कामे जलदगतीने करण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार शुक्रवारी शिबिर होईल. शिबिरात ९ जुलैअखेर दाखल झालेल्या प्रकरणातील निर्गत झालेल्या प्रस्तावांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चौकट
२३५ प्रकरणे दाखल
१ एप्रिल ते ९ जुलै २०२१ अखेर २३५ बांधकाम परवानगीची प्रकरणे दाखल झालेली आहेत. यापैकी १४३ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ५१ प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत. ४१ प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. यातीलही अधिकाधिक प्रकरणे शिबिरात निर्गत करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. बलकवडे यांनी नगररचना प्रशासनास दिल्या आहेत.