शिवाजी पेठेत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:19 IST2017-10-03T18:19:25+5:302017-10-03T18:19:25+5:30
शिवाजी पेठ इंगवले गल्ली येथे राहत्या घरी सिलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. अशोककुमार आनंदराव इंगवले (वय ६१) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते.

शिवाजी पेठेत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
कोल्हापूर , दि. ३ : शिवाजी पेठ इंगवले गल्ली येथे राहत्या घरी सिलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. अशोककुमार आनंदराव इंगवले (वय ६१) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते.
अधिक माहिती अशी, अशोककुमार इंगवले हे बांधकाम व्यावसायिक होते. सोमवारी जेवण करून ते बेडरूममध्ये झोपले. सकाळी सातच्या सुमारास त्यांना उठविण्यासाठी पत्नी गेली असता सिलिंग फॅनच्या हुकाला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना तत्काळ बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अचानक घडलेल्या या प्रकाराने इंगवले कुटुंबीयाला मानसिक धक्काच बसला. त्यांनी आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, त्याची शोधाशोध केली असता मिळून आली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्यांचा पुतण्या प्रकाश इंगवले यांनी वर्दी दिली.