सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:23+5:302021-05-31T04:18:23+5:30

शिरोली : पुणे-बेंगलोर महामार्गाची उंची वाढली तर शिरोली ,शिये, कसबा बावडा, भुये, निगवे, चिखली ही गावे महापुराच्या पाण्याखाली जातील. ...

Build a pillar flyover from Sangli Fata to Panchganga river | सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करा

सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करा

शिरोली : पुणे-बेंगलोर महामार्गाची उंची वाढली तर शिरोली ,शिये, कसबा बावडा, भुये, निगवे, चिखली ही गावे महापुराच्या पाण्याखाली जातील. त्यामुळे शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करा, अशी मागणी शिरोली व शिये ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी बास्केट ब्रिज, गांधीनगर फाटा येथील ब्रीज, पंचगंगा नदीवरील पूल यांची पाहणी केली. यावेळी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक वसंत पंदरकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरावेळी पुणे-बेंगलोर महामार्गावर आठ फूट पाणी आले होते. शिरोली, शिये, कसबा बावडा, भुये, निगवे ही गावे पाण्याखाली गेली होती. आता महामार्गावर भर टाकून उंची वाढवली तर ही गावे पाण्याखाली जाऊन बुडतील. त्यामुळे शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा, अशी मागणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, संग्राम कदम, सरदार मुल्ला, दीपक खवरे, ज्योतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, राहुल खवरे उपस्थित होते.

चौकट : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करावा, नागाव फाटा येथे मोठा उड्डाणपूल उभा करा, शिरोली एमआयडीसीत तीन लहान भुयारी मार्ग आहेत ते मोठे करावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी केली. तर वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी गावची पाईपलाईन सेवा मार्गालगत आहे. ती खराब झाली तर ती पुन्हा घालून द्यावी, अशी मागणी केली.

शिये फाट्यावरील भुयारी मार्गाची रुंदी आणि उंची वाढवावी, अशी मागणी नागावच्या सरपंच रेखा जाधव, उपसरपंच शिवाजी गाडवे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्वीनी पाटील, पूनम सातपुते, शीतल मगदुम, सर्जेराव काशीद, जयसिंग पाटील, विकास चौगुले यांनी केली.

चौकट :-

कागल-सातारा सहापदरी रुंदीकरणाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मालिकेचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जून उल्लेख केला.

फोटो : ३० शिरोली पाहणी

कागल - सातारा सहापदरी रुंदीकरणाबाबत शिरोली येथे नागरिकांशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संवाद साधला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजूबाबा आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, सरपंच शशिकांत खवरे, प्रकल्प अधिकारी वसंत पंदरकर‌, सुनील पाटील, बाजीराव सातपुते उपस्थित होते.

Web Title: Build a pillar flyover from Sangli Fata to Panchganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.