किसरूळनजीकच्या ओढ्यावर पूल बांधा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:21+5:302021-07-31T04:24:21+5:30

किसरूळ गावानजीक गाडी ओढा नावाचा ओढा आहे. या ओढ्यावरील मोरीला लहान पाइप बसविण्यात आले आहेत. सध्या पात्र एका बाजूने ...

Build a bridge over a stream near Kisrul; Otherwise movement | किसरूळनजीकच्या ओढ्यावर पूल बांधा; अन्यथा आंदोलन

किसरूळनजीकच्या ओढ्यावर पूल बांधा; अन्यथा आंदोलन

किसरूळ गावानजीक गाडी ओढा नावाचा ओढा आहे. या ओढ्यावरील मोरीला लहान पाइप बसविण्यात आले आहेत. सध्या पात्र एका बाजूने वाहत आहे, तर मोरी सरळ असणे अपेक्षित असताना वेगळ्या बाजूला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात तुटून गेला आहे. पाणी वाहत असल्यामुळे तुटलेला रस्ता दिसून येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही वाहनांचे अपघात झाले आहेत.

संपूर्ण जांभळी खोऱ्यातील पंधरा गावांतील वाहतूक या मार्गावरून सुरू असते. ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. रस्ता तुटून गेल्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या पाइपलाइन व शेजारच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ओढ्यावर तत्काळ पूल बांधावा, अशी मागणी माळवी, तळेकर यांनी केली.

फोटो ः१) गाळाने पाइप भरल्यामुळे किसरूळ येथील ओढ्याचे रस्त्यावरून वाहणारे पाणी.

२) पाण्याच्या प्रवाहामुळे तुटून गेलेला रस्ता.

Web Title: Build a bridge over a stream near Kisrul; Otherwise movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.