Bugte: Two killed in road mishap near Alur | बुगटे- आलूरनजीक अपघातात दोघे जण ठार

बुगटे- आलूरनजीक अपघातात दोघे जण ठार

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा व बाळू हे दोघे जण दुचाकीवरून संकेश्वरला जनावरांच्या बाजारासाठी आले होते. बाजारानंतर सायंकाळी ते गावी मासेवाडीला परत जात होते.

दरम्यान बुगटे आलूर- उत्तूर रस्त्यावर आले असता उत्तूरहून येणाऱ्या एमएच १० सीआर ७४०७ क्रमांकाच्या मालवाहतूक टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली व फरपटत जाऊन दुचाकी व टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडले. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला.

संकेश्वर पोलिसांत रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली.

Web Title: Bugte: Two killed in road mishap near Alur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.